पंढरीची पायी वारी करीत वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड सुरु ठेवणाऱ्या मावळ तालुक्यातील सुमारे 5,000 स्त्री पुरुष वारकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन पोशाख प्रदान करत आमदार सुनिल शेळके यांनी समस्त वारकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आमदार शेळके यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या श्री विठ्ठल परिवार मावळ,सकळ दिंडी नियोजन समिती यांच्या वतीने गेली काही वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आमदारांनी प्रत्येक गावात पोशाख पाठवून सन्मान केल्याबद्दल तालुक्यातील वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज गायकवाड म्हणाले की, पायी वारीची परंपरा मावळ तालुक्यातील हजारो वारकऱ्यांनी आजही जपली आहे आणि या वारकऱ्यांची सेवा करण्याचे महान कार्य आमदार सुनिल शेळके विविध माध्यमातून कायमच करत आले आहेत. त्यांच्या या सेवाकार्याला आमच्या नेहमीच सदिच्छा आहेत. ( distribution of clothes to 5 thousand Warkari of Maval taluka through MLA Sunil Shelke )
“मावळ तालुक्याला असा आमदार लाभला आहे ज्यांचे वारकरी संप्रदायासाठी खूप योगदान आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने मावळातील पाच हजार पुरुष महिला वारकऱ्यांना घरपोच पोशाख देऊन त्यांनी सन्मानित केले. खुप समाधान वाटले. सर्व वारकऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमी आहेत,” अशा भावना श्री क्षेत्र घोरावडेश्वर दिंडीचे अध्यक्ष हभप मुकुंद नाना राऊत यांनी व्यक्त केल्या.
श्री विठ्ठल परिवार मावळ, सकळ दिंडी नियोजन समिती यांच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अखंड हरिनाम सप्ताह, उन्हाळी सुट्टीत बाल वारकरी प्रशिक्षण शिबिर, तालुकास्तरीय भजन स्पर्धा, विणेकरी सन्मान, भव्य कीर्तन महोत्सव अशा उपक्रमांना तालुक्यातील वारकरी संप्रदायाकडून दरवर्षी मोठा प्रतिसाद असतो.
अधिक वाचा –
– येळसे गावात भात लागवडीस सुरूवात, मावळ कृषि विभागाच्या कृषि संजिवनी मोहिमेला यश । Maval News
– ‘आम्ही इथले भाई…’ असे म्हणत तळेगाव शहरात गोळीबार करणाऱ्या गुंडांना नाशिकमधून अटक, 7 गावठी पिस्तूल जप्त । Talegaon Crime
– इंदोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप नाटक यांची बिनविरोध निवड । Maval News