टाकवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत कै. दत्ताशेठ तुकाराम गायकवाड यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. कै. दत्ताशेठ गायकवाड यांचे बंधू तसेच माजी उपसरपंच बाबाजी तुकाराम गायकवाड यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शाळेतील एकूण 375 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ज्यात वह्या, पेन सोबत खाऊचे वाटप करण्यात आले. कै. दत्ताशेठ गायकवाड यांचे बंधू बाबाजी गायकवाड हे मागील तेरा वर्षांपासून आपल्या बंधूच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम राबवत आहेत. यावेळी शालेय समिती अध्यक्ष संदीप मालपोटे यांच्या वतीने बाबाजी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व उपस्थित असणारे कार्यकर्ते यांचा शाळेतील शिक्षकांच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक अतुल गायकवाड यांनी आभार मानले.
यावेळी कान्हे गावचे माजी सरपंच राजेंद्र सातकर, शिलाटणे गावचे माजी उपसरपंच पांडुरंग येवले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप मालपोटे, माजी अध्यक्ष चंद्रकांत असवले, माजी अध्यक्ष विष्णू जांभुळकर, उद्योजक रोहिदास उर्फ पप्पू कोंद्रे, उद्योजक रोहिदास कोंडे, दुग्ध व्यवसायिक मारुती गायकवाड, उद्योजक दत्तात्रेय लोंढे, प्रसिद्ध व्यावसायिक अमोल गायकवाड आणि कै. दत्ताशेठ गायकवाड स्नेह ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते. ( Distribution of school materials to students of Zilla Parishad School at Takwe Budruk )
अधिक वाचा –
– एकविरा देवीचे दर्शन घेऊन माघारी फिरलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात ! 1 ठार, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway
– मावळातील दिंड्यांकडून आमदार सुनिल शेळकेंचा सन्मान ; आमदार शेळके संतांच्या शिकवणीचे पालन करत असल्याचे गौरोद्गार
– मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत’ घालतेय साद । Maval News