नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे पवना विद्या मंदिर शाळेचे जेष्ठ अध्यापक, तसेच मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भारत काळे यांना पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संघातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा स्तरीय गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार झाल्यानंतर भारत काळे यांच्यावर चोहोबाजूंनी कौतूकाचा वर्षाव होतो आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारत काळे हे मागील अनेक वर्षांपासून पत्रकारिता आणि अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. पवन मावळ भागात पत्रकारिता करत असतानाच त्यांनी पवना विद्या मंदिर शाळेतील अनेक पिढ्या घडवल्या आहेत. ह्यासह एक सुशिक्षित आणि जागरुक नागरिक म्हणून सामाजिक क्षेत्रातही ते सातत्याने योगदान देत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिक्षक म्हणून अध्यापन करत असताना स्वयं अध्यनाच्या जोरावर पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या या यशाचे कौतूक होत असतानाच आता त्यांच्यावर शासनाने कौतूकाची थाप टाकत गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार्थी असल्याची घोषणा केली. ( District level meritorious teacher award announced to journalist Bharat Kale )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दुःखद! मावळ भाजपाचे माजी उपाध्यक्ष सुदामराव घारे यांचे निधन
– करुंज ग्रुप ग्रामपंचायतीमधील 25 आदिवासी (कातकरी) बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप
– 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती विशेष : “महात्मा गांधीजी आणि तळेगाव दाभाडे शहर यांच्यातील आठवणींना उजाळा