Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. पतसंस्थेचा कर्जदार वर्ग हा समाजातील सर्वसामान्य घटक असून सभासदांच्या मुलांसाठी आणि सभासदांसाठी आपण कल्याणकारी योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक विलास बबनराव काळोखे यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
नारायणराव काळोखे पतसंस्था ही गेली 31 वर्षे तळेगाव शहरातील छोटे व्यवसायिक, पथारीवाले, लघु उद्योजक, हातगाडी वाले, भाजी विक्रेते इत्यादींना अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा सातत्याने करत आहे. कार्यक्रमादरम्यान सभासदांच्या विशेष गुणवत्ता प्राप्त पाल्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या व उत्तम कामगिरी करणाऱ्या दैनंदिन प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थेला 31 वर्ष पूर्ण झाले असून सध्या 1869 सभासद आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत काळोखे यांनी केले, सेक्रेटरी विश्वनाथ काळोखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तज्ञ संचालक संजय संदानशिव यांनी अहवाल वाचन करून सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सुरेश शेंडे, भगवान शिंदे, संजय मेहता, दिलीप पारेख इत्यादी सभासदांनी संस्थेच्या हिताच्या सूचना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापिका रोहिणी नाटक, संध्या मांदळे, चंद्रकांत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.
अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी रविंद्र भेगडे सरसावले । BJP Ravindra Bhegade
– वडगाव नगरपंचायतीचा ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम, अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून वृक्षलागवड । Vadgaon Maval