मावळ तालुका ( Maval Taluka ) पंचायत समितीच्या ( Panchayat Samiti ) वतीने दरवर्षी तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार ( Enterprising School Award ) देण्यात येतात. यंदाचा हा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार (24 सप्टेंबर) रोजी वडगाव येथे संपन्न झाला. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी पवनमावळमधील तुंग ( Tung ) या दुर्गम भागातील शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार प्राप्त झाला.
हेही वाचा – श्री ज्ञानेश्वर विद्या निकेतनचे आदर्श शिक्षक गणेश पाटील यांच्यावर शिक्षक परिषदेकडून मोठी जबाबदारी!
तुंग गावचे आदर्श व्यक्तीमत्व आणि चावसर ( Chavsar ) केंद्राचे केंद्र प्रमुख मारुती भागू ठोंबरे ( Teacher Maruti Thombare ) हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुंगचे ( Zilla Parishad School ) मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या प्रयोगशील आणि उपक्रमशील गुणांमुळे तुंग शाळा ही नेहमीच पंचक्रोशीत चर्चेत असते. शाळेतील एकूण अध्यापनाचा दर्जा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांद्वारे जि. प. तुंग शाळेत विद्यार्थ्यांची सर्वांगीण जडणघडण होत असते. या सर्व कार्याची नोंद शिक्षण विभागाकडून घेण्यात आली. ( Zilla Parishad School Tung Won Enterprising School Award )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार पंचायत समिती मावळ (शिक्षण विभाग) आणि मावळ डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने उपक्रमशील शाळा पुरस्कार सन 2022-23 हा जिल्हा परिषद शाळा तुंग या शाळेस देण्यात आला. आमदार सुनिल शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे या मान्यवरांच्या हस्ते मारुती ठोंबरे यांनी हा पुरस्कार स्विकारला. ( Due Efforts Of Teacher Maruti Thombare Zilla Parishad School Tung Won Maval Panchayat Samiti Enterprising School Award )
अधिक वाचा –
नव्या जबाबदारीबद्दल ज्येष्ठ अध्यापक, आदर्श शिक्षक भाऊसाहेब खोसे यांचा खास सन्मान
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा यादी