Dainik Maval News : आपल्याकडे तुळशीचे लग्न झाल्यानंतर लगीनसराई सुरु होते. लगेचच मार्गशीर्ष महिना देखील येतो. सध्या सुरु असलेला मार्गशीर्ष महिना हा विविध देवदेवतांच्या उत्सवाचा काळ असतो. सोबत घरोघरी महालक्ष्मीची पुजा असते. त्यामुळे सध्या बाजारात फुलांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. लग्न सोहळ्यात सजावटीसाठी आणि धार्मिक पुजाविधी कार्यक्रमांत पुजेसाठी फुलांची आवश्यकता असते, त्याकारणाने सध्या मार्केटमध्ये फुलांची मागणी वाढली असून यामुळे फूल विक्रेत्यांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.
सध्या लगीन सराई सुरू आहे. अलीकडच्या काळात लग्न समारंभात इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडून सजावटीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळे संबंधित कंपन्या मोठ्या प्रमाणावर फुलांची खरेदी करीत असतात. यासह सध्या मार्गशीर्ष महिना सुरु आहे. याकाळात घरोघरी महालक्ष्मी देवीची पुजा केली जाते. त्यावेळी देवीच्या सजावटीसाठीही मोठ्या प्रमाणात फुल खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारात फुलांची मागणी अधिक वाढली आहे.
मावळातील काही भागात बारमाही फुल शेती केली जाते. अनेक शेतकऱ्यांचे फुलशेतीचे मोठे पट्टे असून त्यांच्या फुलांना बारमाही मागणी असते. सध्या नोव्हेंबर – डिसेंबर या काळात फुलांचे उत्पादन सुरुच असून फुलांना मागणी देखील चांगली असल्याने फुल विक्रेत्यांना यामुळे चांगले दिवस आले आहेत. तर दिवाळी, दसऱ्यानंतर आता लग्न हंगाम व उत्सव काळात फुलांची मागणी कायम असल्याने फुल विक्रेते देखीसल खुशीत आहेत.
दसरा-दिवाळी, गणेशोत्सव सणांप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा फुलांच्या मागणीचा हंगाम आहे. या काळातही पिवळ्या फुलांना विशेष मागणी असते. विशेष करून झेंडू, गुलाब या फुलांना चांगली मागणी असते. या दोन्ही फुलांचे चांगले उत्पादन हे मावळ तालुक्यात होत असते. मार्गशीर्ष महिना डोळ्यासमोर ठेवून शेतकरी या फुलांचे उत्पादन घेत असतात. तसेच मागणी चांगली असल्यानेस दरही मनासारखे मिळत असल्याने फुल उत्पादक व विक्रेत्यांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे दिसते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
– तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल
– मावळमधील शिक्षकांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंसमोर मांडल्या समस्या । Maval News