मावळ लोकसभा (Maval Loksabha) मतदारसंघाचे संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे (MP Shrirang Barne) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. चिंचवड (Chinchwad) येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोणावळा (Lonavala) येथील शिवदुर्ग मित्र (Shivdurg Mitra) टीमला ‘दुर्ग रत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमला हा दुर्ग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते अशोक समर्थ, जेष्ठ इतिहास अभ्यासक लेखक सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिवदुर्गच्या टीमला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इतिहास अभ्यासक नामदेवराव जाधव यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ( Durg Ratna Award to Shivdurg Mitra Team from Lonavla Maval )
शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या वतीने शिवदुर्गचे उपाध्यक्ष महेश मसने, सचिव सुनिल गायकवाड, सहसचिव आनंद गावडे, संचालक राजेंद्र कडु यांनी हा पुरस्कार स्विकारला. गेल्या कित्येक वर्षांसून रेस्क्यू ऑपरेशन वेळी शिवदुर्गची टीम पुणे जिल्हा आणि जवळील जिल्ह्यांत जाऊन काम करत आहे. अनेकांचे प्राण या टीमने वाचवले आहेत. तर कित्येक अशक्य वाटणारी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडली आहेत.
अधिक वाचा –
– डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade
– पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक
– मोठी बातमी! भंडारा डोंगरावरील मंदिरासाठी खासदार श्रीरंग बारणेंकडून अडीच कोटी निधी देण्याचा संकल्प, एक कोटीचा धनादेश सुपूर्द