मावळ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिरापर्यंत रोप-वे उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) राज्य सरकारच्या पायाभूत समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्यास आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना अवघ्या तीन मिनिटात कार्ला गडावर पोहोचता येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
एकविरा देवी मंदिर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी वर्षभर भाविक येत असतात. तसेच कार्ला लेणी देखील जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी साधारण 9 ते 10 लाख भाविक येतात. परंतू, देवीचे मंदिर उंच गडावर असल्याने भाविकांना मोठा त्रास होतो. त्यांची या त्रासातून मुक्तता व्हावी आणि देवीचे दर्शन सहज सुलभ व्हावे, यासाठी रोप- वे करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे पर्यटकांच्या सोयीसाठी या ठिकाणी रोप-वे प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्यामुळे इथे रोप-वे झाल्यास भाविकांसह पर्यटकांचीही मोठी सोय होणार आहे. ( Ekvira Devi Karla Fort Rope Way project information and updates )
रोप-वे प्रकल्प पुर्णतः पर्यावरणपूरक –
एकविरा देवीचे देवीचे मंदिर डोंगरावर आहे. पायऱ्या चढून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो. मात्र रोप-वे झाल्यास अवघ्या तीन मिनिटांत गडावर पोचता येणार आहे. रोप-वेच्या माध्यमातून दर तासाला सुमारे 1 हजार 440 नागरिक गडावर पोहोचू शकतील. हा रोप-वे प्रकल्प सुमारे 120 मीटर उंचीवर असून त्यांची लांबी 290 मीटर असणार आहे. तसेच हा प्रकल्प पर्यावरणपूरक असणार आहे.
अधिक वाचा –
– मावळमध्ये ‘दादा गट’ ॲक्टिव्ह मोडवर! सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ‘गावभेट संवाद दौऱ्याची’ सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक
– मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद
– अभिमानास्पद! परंदवडीच्या मा. सरपंच सुलभा भोते यांना ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल एक्सिलेंट सरपंच’ पुरस्कार