पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून एका 65 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून व्यक्तीला बेदम मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळेगाव दाभाडे, चिंचवड, टाकवे या परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन संशयितांना तत्काळ अटक केली आहे. यामागे आर्थिक कारण असल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्रीकृष्ण उद्धवराव टकले (वय 65) असे पीडित ज्येष्ठ नागिरकांचे नाव होते. या प्रकरणी टाकवे येथील शिवाजी राजाराम गरुड (65) आणि तळेगाव दाभाडे येथील अनिल शिवलिंग कोळी (45) अशी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील रहिवासी किरण शंकर खोल्लम (वय 48) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले हे फिर्यादी खोल्लम यांचे सासरे होते. टकले हे खोल्लम यांच्या निवासस्थानी असताना, आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जबरदस्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी टकले यांना ताब्यात घेत असल्याचे सांगून वाहनात बसवले. मात्र, त्यांनी टकले यांना चिंचवड येथील गरुड यांच्या मुलीच्या घरी नेऊन त्यांना बेल्टने बेदम मारहाण केली. ( Elderly abducted and brutally murdered fake policeman arrested incident in Maval )
अधिक वाचा –
– तळेगाव स्टेशन सोसायटीच्या चेअरमन पदी दत्तात्रय दाभाडे बिनविरोध, तर व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड
– दिवाळी सणाला गावी जाताय? मग हि बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे….
– धक्कादायक! वडगाव मावळमध्ये एकाच घरातील तीन भावंडे बेपत्ता, पोलिसांकडून शोध सुरु