Dainik Maval News : समस्त ग्रामस्थ सांगवी व प्रशांत दादा भागवत युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “मनोरंजन संध्या 2025” हा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्स्फूर्त वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमात पारंपरिक उखाणे, मनोरंजक प्रश्नमंजुषा, गमतीशीर खेळ, विचित्र हास्य स्पर्धा, तसेच गप्पागोष्टी आणि धमाल स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांच्या या उत्साही सहभागामुळे कार्यक्रम रंगतदार आणि संस्मरणीय ठरला.
या सोहळ्यास मा. सरपंच सौ. मनीषाताई लालगुडे, मा. सदस्य श्री. महादूनाना खांदवे, मा. उपसरपंच सौ. रखाबाई भोईर, मा. कुंदाताई खांदवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच ऋषिकेश लालगुडे, नवनाथ तोडकर, विकास लालगुडे, रोहित खांदवे, संभाजी तोडकर, मनोज खांदवे, दिनेश लालगुडे, किरण लालगुडे, श्री. राजाराम ओव्हाळ, गणेश ओव्हाळ, अभिषेक खांदवे, कानिफनाथ तोडकर, सुधाकर लालगुडे, अक्षय तोडकर, शेखर तोडकर आदींचीही विशेष उपस्थिती होती.
प्रशांत दादांची जनसंपर्क मोहीम ठळकपणे यशस्वी –
कार्यक्रमात उपस्थित महिला व ग्रामस्थांनी प्रशांत दादा भागवत यांना मोठा प्रतिसाद दिला. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचा प्रभाव सातत्याने वाढत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. युवा मंचाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध उपक्रमांमुळे ग्रामीण भागात महिलांच्या सामाजिक सहभागाला चालना मिळत असून, यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
“ग्रामविकासासाठी महिलांचा सहभाग अत्यावश्यक असून, त्यांच्या उत्साही सहभागातून समाज परिवर्तनाला दिशा मिळते,” असे प्रशांत दादा भागवत यांनी यावेळी सांगितले.
संपूर्ण सांगवी परिसरात महिलांचा उत्साह, ग्रामस्थांची उपस्थिती आणि युवा मंचाचे उत्तम आयोजन यामुळे “मनोरंजन संध्या 2025” हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘आयुष्मान भारत गोल्ड कार्ड’ तयार करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन – जाणून घ्या योजनेबद्दल
– गणेशोत्सवातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची – एसीपी विकास कुंभार
– देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाला ठोस निर्देश