मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील 13 दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठान आणि लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत दिव्यांग नावनोंदणी अभियान राबविण्यात आले होते. त्यात नावनोंदणी केलेल्या 13 दिव्यांग बांधवांना साहित्य घेऊन देण्यासाठी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना वडगाव येथून मुंबईला नेण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यात, त्यांना मोफत अत्याधुनिक व्हीलचेअर, कुबडी, वॉकर, कृत्रिम मॉड्युलर पाय तसेच कॅलिपर्स आदी साहित्य वाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 17 डिसेंबर) वडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात झाला. काही दिव्यांग बांधवांना इतर अत्यावश्यक वस्तू घरपोच देण्यात आल्या. काही दिवसांत शहरातील उर्वरित दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली. ( essential materials distributed to disabled in vadgaon maval )
आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात महिनाभर ठाकर समाजातील कुटुंबीयांचे जातीचे दाखले, वारकरी संप्रदायासाठी भजन स्पर्धा, महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा, विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप, आयुषमान भारत योजना लाभ तसेच दंत तपासणी आदी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती अबोली ढोरे यांनी दिली.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ‘या’ 15 ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या
– शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग
– ‘लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होणार’, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन