लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान 5 टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु. 95 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु. 40 लाख इतकी आहे. ( Expenditure limit for Lok Sabha candidate in Maharashtra is 95 lakhs EC Press Conference )
निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु असून ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील.
शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये एकूण 150 मतदान केंद्रे अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये उभारण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या ३०-अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदान होणार असून, नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि. 28 मार्च, 2024 रोजी सुरु होईल.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभेत भाजपचा खासदार पाहिजे! बारणेंविरोधात मावळ भाजपा आक्रमक, बाळा भेगडेंच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांना साकडे
– मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Talegaon Dabhade
– आचारसंहिता लागण्याआधीच आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यासाठी खेचून आणला भरघोस निधी । MLA Sunil Shelke