खरेदी खतामध्ये ( Land shopping ) रद्द केलेले कुलमुखत्यारपत्र दस्त जोडून तसेच खोटे आणि चुकीचे घोषणापत्र देऊन नोंदणी अधिनियमाचा भंग करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव पोलिसांनी ( Vadgaon Maval Police ) दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. चेतन खेरजमल आगीचा (रा. तक्षशिला को-ऑप हाउसिंग सोसायटी (म्हाडा) मोरवाडी, पिंपरी) आणि संतकुमार हेमचंद कृपलानी (रा. शेरे पंजाब सोसायटी, अंधेरी पूर्व, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ( Fake Land Purchase Kharedi Khat Affidavit Case Registered Against Two Persons In Vadgaon Maval Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव मावळचे ( Vadgaon Maval ) तत्कालीन दुय्यम निबंधक बळवंत किसन कणसे ( Secondary Registrar Balwant Kanse ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मार्च 2008 रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा फसवणुकीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सोमवारी (21 नोव्हेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींनी संगनमताने इंदोरी ( Indori ) येथील एका जमिनीचे मूळ मालक मालती धोंडीबा भालेकर, हेमंत धोंडिबा भालेकर, शिशिर धोंडिबा भालेकर, संगीता सुरेश राऊत, संजय धोंडिबा भालेकर यांच्याकडून मिळकतीचे घेतलेले कुलमुखत्यारपत्र झालेले असताना मिळकतीच्या खरेदी खतामध्ये ( Kharedi Khat ) ते जोडले. त्याच्या आधारे मान्यता देऊन तसेच खोटे आणि चुकीचे घोषणापत्र देऊन नोंदणी अधिनियमाचा भंग केला आणि सरकारची फसवणूक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास ए. एम. तावरे करत आहेत. ( Fake Land Purchase Kharedi Khat Affidavit Case Registered Against Two Persons In Vadgaon Maval Police )
अधिक वाचा –
– ‘महिन्याच्या आत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावा, नाहीतर धरणाचे पाणी बंद करु’, आमदार सुनिल शेळकेंचा इशारा
– तळेगाव दाभाडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त