व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळ भागात आधुनिक पद्धतीने भात लागवडीला सुरुवात, वारू गावातील शेतकऱ्यांची चारसूत्री पद्धतीला पसंती

मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. वारू हे गाव आज आधुनिक शेती पद्धतीने शेती करत आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 11, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
planting-rice

Photo Courtesy : Vikas Gosavi


मावळ तालुक्यातील पवन मावळ हे भाताचे कोठार समजले जाते. वारू हे गाव आज आधुनिक शेती पद्धतीने शेती करत आहेत. बऱ्याच दिवसापासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते, आता पाऊस हळुहळु सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड सुरु केल्या आहेत. वारू गावातील प्रगतशील शेतकरी व कृषिमित्र सुनील चिंचवडे यांच्या शेतात चारसूत्री पद्धतीने भात लागवड कृषिसहाय्यक विकास गोसावी यांच्या मार्गदर्शना खाली सुमारे एक एकर क्षेत्रावर करण्यात आली. ( Farmers started planting rice in modern way in Maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पावसाभावी भात लागवडी खोळंबल्या होत्या. परंतू चांगला पाऊस चालू झाल्याने शेतकऱ्यांनी भात लागवड दोरीच्या साह्याने 15 बाय 25 सेंमी अंतरावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड वारू, काळे, शिळींब परिसरात चालू केल्या आहेत. लागवडीनंतर यूरिया ब्रिकेट खत गोळ्याचा वापर चार चूडाच्या मधे एक गोळी अशा प्रकारे, लागवडी नंतर दोन ते तीन दिवसात लावणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

मजुराचा तुटवडा व ह्यावर्षी पाऊस उशीरा झाल्या कारणाने शेतकरी आधुनिक लागवडीकडे वळले आहेत. ह्या वर्षी बहुसंख्य शेतकरी चारसुत्री पध्दतीने लागवड करत आहेत. शेतकरी भातलावणी करताना तीन ते चार भातरोपे लावत आहेत. कमी रोपे लागत असल्यामुळे ही पद्धत शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. वारू, महागाव, मळवंडी ठुले, ब्राह्मनोली, काळे, येळसे, शिळींब, मोरवे, चावसर, प्रभाचीवाडी, सावंतवाडी, मालेवाडी, ढालेवाडी या गावात 200 हेक्टर क्षेत्रावर चारसूत्री भात लागवड करणार असल्याचे कृषिसहायक विकास गोसावी व कृषि पर्यवेक्षक नागनाथ शिंदे यांनी सांगितले.

“मावळ तालुक्यात खरीपातील भात हेच मुख्यपीक आहे. मावळ तालुक्यात 13500 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी चारसूत्री, एस. आर. टी., यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवडी कराव्यात .भात लागवडी नंतर युरिया ब्रिकेटचा वापर करावा.” दत्तात्रय पडवळ (तालुका कृषि अधिकारी, मावळ)

“ह्यावर्षी पावसाने जून महिन्यात खंड दिल्याने रोपवाटिका उशिरा उगवल्याने व जुलै महिन्यात आता पाऊस पडत असल्याने पवनमावळ भात लागवडी चालू झाल्या आहेत. भातलागवडी उशिरा चालू झाल्या आहेत. परंतु आता पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याने भात लागवडी सुरु झाल्या आहेत.” प्रशांत डहाळे (मंडळ कृषि अधिकारी, काळेकॉलनी)

“चारसूत्रीपद्धतीने भात लागवड केल्याने उत्पन्नात वाढ होते. बियाणे कमी लागते. खताचा खर्च वाचतो. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न येते. वारू गावात शेतकरी चारसूत्री पद्धतीने मोठ्या प्रमाणात भात लागवड करतात.” सुनिल चिंचवडे (प्रगतशील शेतकरी तथा कृषिमित्र, वारू)

अधिक वाचा –
– कुंडमळा इथे वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडला, लेकाच्या मृतदेहाला बघताच आईने फोडला टाहो
– किशोर आवारे हत्या प्रकरण : कोर्टाकडून आरोपी भानू खळदे ह्याला ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कस्टडी । Kishor Aware Murder Case


Previous Post

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । तब्बल 300 वृक्षांची लागवड… Khopoli News

Next Post

मोठी बातमी! मावळ काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
मोठी बातमी! मावळ काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

मोठी बातमी! मावळ काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी मिलिंद अच्युत, पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.