लायन्स क्लब ऑफ खोपोली आणी मेसर्स गार्गी H A कंपनी होनाड ह्यांच्या संयुक्त विद्यमाने होनाड येथे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. ह्या वर्षी ३०० झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचे योजिले आहे.
मागील वर्षी देखील लायन्स क्लब ऑफ खोपोली आणि Gargi H A ह्यांनी ५९० झाडे लावली होती , टीम गार्गीच्या अथक परिश्रमाने त्यातील ७० टक्के झाडांचे संवर्धन करण्यास यश आले. ( Plantation of 300 trees by Lions Club of Khopoli and M/s Gargi HA Company Honad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आडोशी हा परिसर इंडस्ट्रिअल एरिया असल्याने तेथे पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीची आत्यंतिक गरज लक्षात घेऊनच येथे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम यशस्वी रित्या राबविण्यास आणि नंतर झाडांचे संवर्धन करण्यासाठी उपक्रम प्रमुख लायन राज गावडे आणि Gargi H A चे कर्मचारी ह्यांचे मोलाचे योगदान आहे.
लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन अतीक खोत ह्यांनी ह्या उपक्रमाची गरज लक्षात घेऊनच येथे वृक्षारोपण करण्यात आले असे तसेच ह्या वर्षी ३०० झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले आणि उपस्थित सर्व लायन्स क्लबचे सदस्य आणि गार्गी कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरण : कोर्टाकडून आरोपी भानू खळदे ह्याला ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कस्टडी । Kishor Aware Murder Case
– लोणावळा शहरात रक्तदान शिबिर, 253 बाटल्या रक्त संकलित । Lonavala News
– जंगली रमीच्या नादात गमावला जीव, मावळ तालुक्यातील खळबळजनक घटना