लोणावळा शहरात दर्जेदार सामाजिक व अध्यात्मिक कार्यक्रम राबविणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या शंकरबन प्रतिष्ठानकडून वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपत पुरंदरे हायस्कूल लोणावळा येथे शिकत असलेल्या अन् आई-वडील दोघांचे छत्र हरपलेल्या दोन गरीब होतकरू विद्यार्थ्यांची शालेय फी भरून त्यांना पुढील शिक्षणासाठी मदतीचा हाथ देण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पुरंदरे हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर निकम म्हणाले की, समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांना शिक्षणा साठी प्रेरित करणे हे आपल्या सर्वांचे कामे आहे. अध्यात्मिक कार्याबरोबरचं सामाजिक उपक्रम राबविणे आवश्यक असून यापुढील काळात लोणावळा व परिसरातील गरीब होत होतकरू विद्यार्थ्यांसाठी शंकरबन प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना चालू करणार आहे. ( Financial assistance to needy students from Shankarban Foundation in Lonavla )
यावेळी प्रतिष्ठानचे सचिव अनंता टेमघरे, विश्वस्त प्रभाकर भालेकर, जान्हवी अमोल कसबेकर, तसेच कोअर कमिटी सदस्य श्रीकांत घोडके, विशाल जाधव, धर्मेंद्र डुंबरे, राजाराम बिरांजे, गणेश धामणस्कर, संतोष दाभाडे हे उपस्थित होते. प्रतिष्ठान कडून वर्षभर वैद्यकीय मदत, अनाथाश्र, वृद्धाश्रम येथे सेवा केली जाते. याशिवाय शिवजयंती, आंबेडकर जयंती निमित्त पेयजल वाटप, वृक्षारोपण, पुणे जिल्ह्यातील अंध महिलांना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा, अध्यात्मिक ग्रंथ भेट यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात.
अधिक वाचा –
– जागतिक साप दिन : मावळ तालुक्यात आढळतात 37 प्रकारचे साप, त्यातील 8 साप आहेत विषारी । World Snake Day
– मावळ तालुक्यातील शिरदे गावात बिबट्याला पकडण्यात यश, उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्रात रवानगी
– कार्ला-लोणावळा भागात मुसळधार पाऊस ! इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन