मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) एका वयोवृद्धाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. तुमचे विम्याचे पैसे आले असून त्यासाठी अगोदर काही रक्कम भरावी लागेल, असे सांगत एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल 13 लाख 16 हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मावळ तालुक्यातील वारंगवाडी इथे दिनांक 20 मे 2023 ते 20 जुलै 2023 ह्या कालावधीत हा संपूर्ण प्रकार घडला. ( financial fraud of retired senior citizen on pretext of getting insurance money talegaon MIDC police )
तळेगाव एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. 66 वर्षीय सेवा निवृत्त वयोवृद्ध फिर्यादीने याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे, त्या फिर्यादीवरुन सुभाषचंद्र कुणतीया आणि एक महिला आरोपी ह्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिलिटरी इंजिनिअरिंग सेवेत नोकरी करत होते. ते सेवानिवृत्त झाले असून वारंगवाडी इथे वास्तव्यास आहेत. त्यांना दिनांक 20 मे रोजी आरोपींनी फोन करून त्यांचे विम्याचे 82 लाख 50 हजार 910 रुपये आले असल्याचे सांगितले. मात्र हे पैसे मिळविण्यासाठी त्यांनी विमा फी, कर आणि टीडीएस अशी वेगवेगळी कारणे सांगत त्यांना पैसे भरण्यास सांगितले.
ह्यातूनच, फिर्यादींनी एकूण 13 लाख 16 हजार 995 रुपये वेळोवेळी भरले. मात्र त्यांच्या बँक खात्यात कोणतीही विमा रक्कम जमा झाली नाही, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने आणि आरोपींनी पैसे परत न केल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली, असे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करत आहेत. ( financial fraud of retired senior citizen on pretext of getting insurance money talegaon MIDC police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– श्री देवदर्शन यात्रा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या बाल वारकरी वेशभूषा संमेलन ऑनलाईन स्पर्धेची पारितोषिके प्रदान
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या कचरा कॉन्ट्रॅक्ट बाबत चौकशीचे आदेश द्या, अन्यथा आंदोलन करू…’, वाचा काय आहे प्रकरण
– माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रम शाळेतील मुलांना ‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मोठी मदत