मावळ तालुक्यातील वडगाव फाटा इथे सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या शेजारी लागलेली आग विझवण्यात यश आले आहे. शनिवारी (1 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या शेजारील मैदानावर असलेल्या गवताला अचानक आग लागली होती. ही आग सोसायटीच्या इमारतीच्या दिशेने येत होती, तेव्हा वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य असलेले आपदा मित्र सर्जेस पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत ही आग विझवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे बिल्डिंगचे आणि तेथील वाहनांचे होणारे संभाव्य नुकसान टळले. ( Fire Broke Out In Vicinity Area of Society At Vadgaon Maval Phata Accident Was Averted By Disaster Friend )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील कान्हेफाटा इथे फेब्रुवारी महिन्यात आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण शिबिरात मावळ तालुक्यातील पुना सिक्युरिटी मध्ये फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत असणारे सर्जेस पाटील यांनीही सहभाग घेतला होता. या प्रशिक्षण शिबिरात मिळालेल्या माहिती आणि प्रशिक्षणाचा उपयोग करुन सर्जेस पाटील यांनी आपल्या सोसाटीच्या परिसरात लागलेली आग विझवली. सर्जेस पाटील यांनी सोसायटीमध्ये असणाऱ्या फायर हायड्रंट सिस्टिमचा वापर करून ही आग तत्काळ विझवली.
अधिक वाचा –
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या कारवाईचा धडाका सुरूच; डीजेच्या तालावर अश्लील नृत्य सुरु असलेल्या बंगल्यावर मध्यरात्री टाकला छापा
– मावळ तालुका हादरला..! शिरगाव गावचे राष्ट्रवादीचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांची भरचौकात हत्या