पुणे : चालू महिन्यात अर्थात जून 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती (पक्के लायसन्स) मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 5 आणि 6 जून रोजी खेड, 12 आणि 13 जून रोजी मंचर, 19 आणि 20 जून रोजी जुन्नर, 26 आणि 27 जून रोजी वडगाव मावळ आणि 28 जून रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– कौतुकास्पद.! आजिवली येथील ज्ञानेश्वर विद्या निकेतनचा दहावीचा निकाल 96 टक्के; शुभम राऊत 89 टक्के गुणांसह प्रथम
– वडेश्वर गावात मोफत आरोग्य शिबिर; धन्वंतरी मेडिकल, डॉ. बडे हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम