मावळ तालुक्यातील पवनमावळ भागात असलेले मौजे शिळींब हे अगदी लहानसे गाव. या गावातील शिवराय फ्रेंड्स सर्कल मंडळाने आयोजित केलेला शिवजन्मोत्सव सोहळा रविवारी (19 फेब्रुवारी) मोठ्या उत्सहात संपन्न झाला. पहाटे शिवज्योत आगमनपासून ते रात्री शिवव्याख्यान आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन मंडळाकडून यावर्षी करण्यात आले होते. ( Food Grains Kit Distributed To Needy On Occasion of Shiv Jayanti 2023 By Shivray Friends Circle Group Shilimb Conceptualized By Aniket Ghule )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी शिवराय फ्रेंड्स सर्कल ग्रुपकडून पुणे जिल्हा युवासेना अध्यक्ष पै अनिकेत घुले यांच्या संकल्पनेतून परिसरातील काही गरजू कुटुंबीयांना अन्नधान्य कीटचे मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक भान राखत आणि सामाजिक बांधिलकी जपत मंडळाकडून परिसरातील गरजू कुटुंबीयांना विविध वस्तूंचा समावेश असलेले हे अन्नधान्य कीटचे वितरीत करण्यात आले. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
शिवराय फ्रेंड्स सर्कल ग्रुप या मंडळाच्या शिवजयंती सोहळ्याचे यंदाचे हे सहावे वर्ष होते. त्यानिमित्त अनेक छोटे-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा आदींचे नियोजन करण्यात आले होते. यासह सायंकाळी शिवप्रतिमेची मिरवणूक, शिवगाथा आणि शिवव्याख्यान या कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली. अखेर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. परिसरातील अनेक शिवभक्तांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
अधिक वाचा –
– पवना शिक्षण संकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, पारंपारिक वेषातील बालगोपाळांनी वेधले सर्वांचेच लक्ष
– राजा शिवछत्रपती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी दिनेश ढोरे; पाहा समितीची संपूर्ण कार्यकारिणी