वडगाव मावळ येथील राजा शिवछत्रपती जयंती उत्सव समिती – सन 2023 च्या अध्यक्षपदी वडगांव नगरपंचायतमधील भाजपाचे गटनेते दिनेश ढोरे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष पदी रवींद्र म्हाळसकर ( नगरसेवक ) आणि कार्यक्रम प्रमुख पदी सोमनाथ ढोरे आणि श्रीधर चव्हाण (मा.नगरसेवक ) यांची निवड करण्यात आली.
शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मावळते अध्यक्ष शेखर वहिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ( Dinesh Dhore Appointed As President of Raja Shiv Chhatrapati Jayanti Utsav Samiti Vadgaon Maval See New Executive Body )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उत्सवाचे यंदा 44 वे वर्ष आहे. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये झालेल्या बैठकीत दिनेश ढोरे यांची सर्वानुमते यावर्षीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्यानंतर उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मंगळवार दिनांक 7 ते शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 या 4 दिवसांदरम्यान विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन, पुरस्कार वितरण सोहळा, मिरवणूक असे नियोजन करून शिवजयंती उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणी – सन 2023 खालीलप्रमाणे ;
अध्यक्ष – दिनेश ढोरे
कार्याध्यक्ष – रवींद्र म्हाळसकर
कार्यक्रम प्रमुख – सोमनाथ ढोरे, श्रीधर चव्हाण
उपाध्यक्ष – शरद मोरे, दीपक कुडे, प्रशांत चव्हाण, सागर भिलारे
सरचिटणीस – कल्पेश भोंडवे
सह चिटणीस – दीपक भालेराव, हरीश दानवे, ओंकार शिंदे
खजिनदार – अतुल म्हाळसकर
सहखजिनदार – अमोल ठोंबरे, गणेश हिंगे
हेही वाचा – मावळ तालुक्यातील ‘या’ गावात महाशिवरात्री निमित्त बहीण-भाऊ भेटीची अनोखी परंपरा
यावेळी झालेल्या बैठकीस वडगाव शहर शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर , नारायणराव ढोरे, अनिस तांबोळी, श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे विश्वस्त सचिव आणि वडगांव शहर भाजपा अध्यक्ष अनंता कुडे, आतिष ढोरे, नगरसेवक किरण म्हाळसकर, मा नगरसेवक ऍड. विजयराव जाधव, प्रसाद पिंगळे, रवींद्र काकडे, भूषण मुथा, शंकर भोंडवे, किरण भिलारे, शरद मोरे, हरीश दानवे, सरस्वती व्याख्यानमालेचे अध्यक्ष पत्रकार सुदेश गिरमे, दिलीप चव्हाण, अरुण वाघमारे, ऍड. अजित वहिले, कल्पेश भोंडवे, अतुल म्हाळसकर, योगेश म्हाळसकर, विनायक भेगडे, शरद मोरे, प्रशांत चव्हाण, दिपक भालेराव, योगेश म्हाळसकर, कुलदीप ढोरे, हरीश दानवे, अमोल ठोंबरे, गणेश हिंगे, ज्ञानेश्वर म्हाळसकर, प्रशांत चव्हाण, मकरंद बवरे, संतोष भालेराव, अतुल चव्हाण, दीपक शास्त्री आदी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीला संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– पवना शिक्षण संकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, पारंपारिक वेषातील बालगोपाळांनी वेधले सर्वांचेच लक्ष
– आंदर मावळातील 40 गावांना जोडणारा जांभूळ रेल्वे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला, नागरिकांनी व्यक्त केले समाधान