शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर यांचे आज (20 फेब्रुवारी) रोजी दुःखद निधन झाले आहे. पुणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. वृद्धापकाळाने लतिका दिवाकर यांचे निधन झाले. ( Shiv Sena Thackeray Group Leader Neelam Gorhe Mother Latika Diwakar Passed Away In Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले. गोऱ्हे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.@neelamgorhe
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 20, 2023
विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॅा. नीलम गोर्हे यांना मातृशोक झाला असून त्यांच्या मातुःश्री श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी 2.30 ते 4.30 सिल्हररॅाक्स, हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी, पुणे इथे ठेवण्यात येणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– श्रीरंग बारणेंचे मंत्रिपद फिक्स? आढळराव पाटलांनी भर सभागृहात चंद्रकांत पाटलांना केली ‘ही’ खास विनंती
– गुडन्यूज..! सोमवारपासून पुणे ते लोणावळा लोकल रेल्वेच्या आणखीन दोन फेऱ्या, पाहा नवीन वेळापत्रक