सीड ट्रस्ट आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया सामाजिक संस्था तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी सध्या काम केले जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून पवन मावळ भागातील अनेक गावात समोजपयोगी कामांसह स्थानिक महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून उद्योजक महिलांना उद्योगांसाठी अनेक नवनवीन कल्पनांसह साहित्य, मशीन यांचे वाटप होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काही दिवसांपूर्वी पवन मावळातील शिळींब गावात महिला बचत गटाला शेवई बनवण्याचे यंत्र वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आता, हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि सीड ट्र्स्ट द्वारे शिळींब गावातीलच अन्य महिला गटाला कांस्य थाळी अर्थात फुट मसाजचे मशीन देण्यात आले. याचे उद्घाटन कृषी अधिकारी संताजी जाधव, MSRLM च्या अभियान व्यवस्थापक मोहिनी लाखे, समन्वयक शीतल सोनजे, राहुल जगताप, स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ( foot massage machines distributed to women self help groups of Shilimb village Maval taluka )
सीड ट्रस्ट आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम उद्धार कार्यक्रम अंतर्गत शिळींब गावात महिला सक्षमीकरण, महिलांची आर्थिक उन्नती आदी विषयांवर सध्या काम होत आहे. महिला गटांना अशा मशीनच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि उद्योग उभारणी करता यावी, हा या मागचा उद्देश आहे. यावेळी ओंकार कुलकर्णी, अभिजित अब्दूले, कविता ढोकरे, निर्मला शिंदे आणि अन्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील तब्बल 12 कोटींच्या विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतात? कोजागिरी शब्दाचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमेला दूध का पितात? जाणून घ्या सर्वकाही
– एकदम अचूक आकडेवारी! निवडणूका जाहीर झालेल्या मावळातील 29 ग्रामपंचायतींचं अंतिम चित्र काय आहे? लगेच वाचा