स्वराज्याच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या मावळ तालुक्यातील किल्ले तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन करण्याचे मोलाचे कार्य सध्या अनेक संस्थांकडून सुरु आहे. यात रविवार (दिनांक 12 मार्च) रोजी पुण्यातल्या झील कॉलेज ऑफ इंजिनिरींग अँड रिसर्च महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विद्यार्थ्यांकडूनही गडावर दुर्गसंवर्धनाच्या कामात हातभार लावण्यात आला. ( Fort Conservation Work On Tikona By NSS Students Of Zeal College of Engineering and Research )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुण्यातील झील कॉलेज ऑफ इंजिनिरींग अँड रिसर्च या विद्यालयातील एनएसएसच्या ( NSS ) विद्यार्थ्यांनी रविवारी गडावरील वेताळ परिसरात साफसफाई करणे, झाडांच्या सभोवतालचे गवत काढणे, झाडांना आळी करणे, पाणी घालणे, दगडांचे कुंपण घालणे आदी कामे करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा वारसा लाभलेल्या मावळ प्रांतातील या महत्वाच्या किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करताना विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे चे सभासद वैभव पाटील यांनी दैनिक मावळ ला याबाबत माहिती दिली.
नऱ्हे पुणे येथील झील कॉलेज ऑफ इंजिनिरींग अँड रिसर्च महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अजित काटे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा अक्षय कारंडे यांच्या नियोजनातून हा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एनएसएस A 122 या यूनीटचे एकूण 18 विद्यार्थी या कार्यात सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– धनघव्हाण गावातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून घरोघरी जलगंगा येणार
– दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या वडगाव मावळमधील एकाला पुण्यात अटक । Pune Crime