मावळ तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत वर्धापन दिन साजरा. ग्रामपंचायतीच्या 43 वा वर्धापनदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालायाला आकर्षक विद्युत रोषणाई करून आणि गावातील सर्व आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी, विविध पतसंस्थांचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षलागवड करून वर्धापन दिन साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
माळवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 1981 साली करण्यात आली. दिनांक 27 जून रोजी ग्रामपंचायतीचा 43 वा वर्धापन दिन होता, त्यानिमित्त वृक्ष लागवड केली गेली. ग्रामपंचायतीमार्फच गावातील नागरिकांना आरओ फिल्टरचे पाणी पुरवण्यासाठी वॉटर एटीएम मशीन बसविण्यात आले. तसेच गावातील रस्ते, वीच, स्वच्छता आदी विभागातील सेवकांचा, तसेच दहावी – बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ( foundation anniversary of Malwadi Gram Panchayat celebrated Maval Taluka )
यावेळी सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच पुजा दाभाडे, सचिव खोमणे, ग्रामपंचायत सदस्य मनिषा दाभाडे, पल्लवी मराठे, जयाताई गोटे, पुनम अल्लाट, रेश्मा दाभाडे, पचपिंड, सुधीर अल्हाट, सचिन शेळके आदी उपस्थित होते. रोहिदास मराठे यांनी ग्रामपंचायतीची स्थापना ते आजपर्यंत गावाचा झालेला विकास याविषयी सर्वांना थोडक्यात माहिती सांगितली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…
– सरप्राईज..! मावळ तालुक्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळकेंचा सुखद धक्का
– प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात करूंज गावातील नागरिकांचे आमरण उपोषण !