Dainik Maval News : मावळ तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना व्यायाम शाळा साहित्यांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत क्रीडा विभागा मार्फत हा निधी उपलब्ध झाला असून याबद्दल आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
आठ ग्रामपंचायतींना निधी
जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत क्रीडा विभागामार्फत मावळ तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना व्यायाम शाळा साहित्य पुरविण्यासाठी 56 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यात ग्रामपंचायत करंजगाव, गोवित्री, मुंञावरे, वारू, शिरदे, शिळींब, साते (ब्राह्मणवाडी), साई (नाणोली) या ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी 7 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
या निर्णयातून मावळच्या क्रीडा विकासाला मोठी चालना मिळेल. युवकांचे आरोग्य सशक्त करण्यासाठी, ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी असून भविष्यातील राष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी ठोस पाऊल पडेल, असे आमदार शेळके यांनी सांगितले. तसेच निधी मिळाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade