Dainik Maval News : तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ शहरातील सात दिवसांच्या बाप्पांचे शुक्रवारी थाटामाटात विसर्जन झाले. डीजे आणि डॉल्बीचा दणदणाट, ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत ही मिरवणूक संपन्न झाली. सायंकाळी सुरु झालेली मिरवणूक रात्री उशीरा संपन्न झाली. तळेगाव शहरातील विसर्जन मिरवणूक ही तब्बल नऊ तास चालली. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे निर्विघ्नपणे विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव, वडगाव शहरात सातव्या दिवशी गणरायाचा विसर्जन सोहळा असतो. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणूकीतून सुरु झाला. दुपारी एक वाजल्यानंतर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी आपल्या विसर्जन मिरवणूका सुरू केल्या. तसेच दुपारी तीन वाजल्यापासून घरोघरीच्या गणेश मुर्तीचे विसर्जन ठिकठिकाणच्या जलस्त्रोत्रच्या ठिकाणी करण्यात आले.
तळेगाव शहरातील विसर्जन मिरवणूक –
मिरवणूकीच्या अग्रभागी श्री डोळसनाथ महाराज मंदीराचा मानाचा पहिला गणपती सजवलेल्या टॅक्टरवर ठेवलेला होता. त्या पाठोपाठ दुसरा मानाचा गणपती कालिका गणेशोस्तव मंडळ, तिसरा मानाचा गणपती तेलीसमाज सार्वजनिक गणेशोस्तवमंडळ, चौथा मानाचा गणपती राजेंद्र चौक गणेशोस्तव मंडळ पाचवा मानाचा गणपती गणेश तरुण मंडळाचा होता. या पाठोपाठ इतर सार्वत्रिक मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतला होता. गावातील इतर भागातून देखील वाजत गाजत मंडळांचा सहभाग होता.
अधिक वाचा –
– इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला
– आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News
– पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News