राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी ही 28 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबरला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 28 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर या दोन्ही दिवशी सरकारी सुट्टी असणार आहे. विशेष म्हणजे 28 सप्टेंबरपासून पुढच्या पाच दिवसांपैकी फक्त एकाच दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर जावं लागेल. कारण 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीची सुट्टी, त्यानंतर 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी असणार आहे. पण 30 सप्टेंबरला शनिवारी कामकाज सुरु असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयांवर जावं लागेल. पण त्यानंतर पुन्हा सलग दोन सुट्ट्या असणार आहेत. कारण 1 ऑक्टोबरला रविवारची सुट्टी येत आहे. तर 2 ऑक्टोबरला महत्मा गांधी यांच्या जयंतीची सुट्टी असणार आहे.
गुरुवार ते सोमवार अशा आहेत सुट्ट्या
गुरुवारी – गणपती विसर्जनासाठी पुणे विभागीय आयुक्त यांनी शासकीय सुट्टी जाहीर केली.
शुक्रवारी – ईद निमित्त शासनाने सुट्टी जाहीर केली.
शनिवार – काम सुरु असेल
रविवारी – शासकीय सुट्टी आहे.
सोमवारी – गांधी जयंती निमित्त शासकीय सुट्टी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुस्लिम समाजाच्या ईद-ए-मिलाद या सणाच्या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. पण यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला. कारण हे दोन्ही सण एका पोठापाठ असते तर आणखी एक सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळाली असती. अखेर दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवारी 28 सप्टेंबर 2023 ऐवजी 29 सप्टेंबर 2023 ला जाहीर करत असल्याचा जीआर शासनाने काढला. ( Ganesh Visarjan and Eid E Milad On Same Day Maharashtra Government Announced Holiday On Friday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– Breaking! शुक्रवारी शासकीय सुटी जाहीर, राज्य शासनाचा निर्णय
– तळेगावमध्ये श्रीगणेश मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 350 गणेशमूर्तींचे संकलन
– ‘मावळातील गावांचा विचार केल्याशिवाय तालुक्यातील धरणांमधील पाण्याबाबत परस्पर निर्णय घेऊ नये’ – आमदार सुनिल शेळके