प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा डान्सर गौतमी पाटील हिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून तो व्हिडिओ फेक इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हायरल केल्या प्रकारणी एका अल्पवयीन मुलाला अहमदनगर येथून विमानतळ पोलिस स्टेशनने ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला जुवेनाईल कोर्टासमोर हजर केल्यानंतर काही दिवसांच्या कोठडीनंतर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर अहमदनगर येथून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने ॲड. सुरज संजय शिंदे यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. अल्पवयीन मुलाच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत में जुवेनाईल कोर्टाने त्याला योग्य त्या अटी आणि शर्तीवर जामीन मुक्त करण्याचा आदेश दिला. ऑर्केस्ट्रा डान्सर गौतमी पाटील हिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्या प्रकरणी तिची सहाय्यक मोनिका धुमाळ हिने विमानतळ पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2023 मध्ये गुन्हा दाखल केला होता. ( Gautami Patil Offensive Video Viral Case Bail granted to minor accused argued by Adv Suraj Shinde )
अधिक वाचा –
– लोणावळा शहरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला अटक । Lonavala Crime News
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी बातमी, अपघात रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय, लगेच पाहा