नवलाख उंबरे गावाजवळील एका कंपनीच्या आवारात रानमांजर असल्याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना मिळाली होती. त्यानंतर वन्यजीव रक्षकचे सदस्य साहिल नायर, साहिल लांडगे, विकी दौंडकर यांनी तत्काळ तिथे जात रान मांजराला सुरक्षितपणे रेस्क्यू केले. तसेच याची माहिती संस्थेचे संस्थापक निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल अंद्रे यांना दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर गणेश निसाळ, गणेश ढोरे, जिगर सोलंकी यांनी सदर रान मांजराची प्राथमिक तपासणी करून वडगाव वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना याबाबत माहिती दिली. तसेच तत्काळ त्या रान मांजराला पुढील उपचारासाठी पुणे इथे पाठवले. कुणाही नागरिकांला कोणताही जखमी वन्यप्राणी आढळल्यास वनविभाग (1926) किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था (9822555004) यांच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे अथवा जवळपास असणाऱ्या प्राणीमित्रांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( gave life wild cat navalakh umbare maval taluka )
अधिक वाचा –
– ‘किशोरभाऊंना न्याय मिळालाच पाहिजे..!’, समर्थकांकडून 17 मे रोजी जाहीर मोर्चाची हाक । Kishor Aware Murder Case
– लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी