व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश

अजितदादांनी मावळच्या जनतेला गणेशोत्सवात सुमारे शंभर कोटींचे विकासाचे गिफ्ट दिले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 21, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Ajit-Pawar-Sunil-Shelke

Photo - Dainik Maval Graphics Team


अजितदादांनी मावळच्या जनतेला गणेशोत्सवात सुमारे शंभर कोटींचे विकासाचे गिफ्ट दिले आहे. लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

“मावळातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने ग्लास स्कायवॉकची उभारणी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकल्पास तत्वतः मान्यता दिल्याबद्दल मावळच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या महत्त्वाकांक्षी पर्यटन विकास प्रकल्पामुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होण्यास नक्कीच मदत होणार आहे.” – आमदार सुनिल शेळके

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठक संपन्न झाली.या बैठकीस आमदार सुनिल शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वन विभागाचे प्रधान सचिव बी गोपाल रेड्डी, पुणे प्रादेशिक मुख्य वन संरक्षक एन. आर. प्रवीण तर दुरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले,लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे.

या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करतांना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये (११ मार्च२०२२) लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. मावळातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फुड पार्क, ॲम्फी थिएटर, खुली जीम, आणि विविध खेळ इ. सुविधा असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. ( Glass skywalks will be constructed at Tiger Point and Lions Point in Lonavala Maval )

tata tiago ads may 2025

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘दिवसभर कडक उपवास आणि रानभाज्यांचा नैवद्य’, पवन मावळातील गावशिवारांत ऋषीपंचमीची खास परंपरा, नक्की वाचा
– ‘मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी होणार, रहिवाशांना मूलभूत सुविधा न देणाऱ्या विकसकांवर कारवाई होणार’
– गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी मिळावी – आमदार शेळके


dainik maval ads may 2025

Previous Post

ऐतिहासिक ‘महिला आरक्षण विधेयक’ लोकसभेत मंजूर, काय आहे हे विधेयक? नक्की वाचा । Women Reservation Bill

Next Post

फक्त लोणावळाच नाही तर मावळमधील कुसूर पठार देखील बनणार ‘जागतिक पर्यटन केंद्र’, वाचा काय म्हटलेत अजितदादा…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kuswali-Kusur-Pathar

फक्त लोणावळाच नाही तर मावळमधील कुसूर पठार देखील बनणार 'जागतिक पर्यटन केंद्र', वाचा काय म्हटलेत अजितदादा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST-Bus

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

June 16, 2025
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

June 16, 2025
MNS President Raj Thackeray detailed reaction on the Kundmala bridge tragedy Maval

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

June 16, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

June 16, 2025
Financial assistance of Rs 5 lakhs to families of those killed in Kundmala accident CM Devendra Fadnavis

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत; जखमींचा उपचार खर्चही सरकार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 16, 2025
Audit all old bridges in state DCM Eknath Shinde orders administration after Kundmala bridge accident

राज्यातील सर्वच जुन्या पुलांचे ऑडिट करा ; कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश

June 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.