पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाळी पर्यटनासाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असलेले लोणावळा शहराजवळील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा शहरात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण रविवारी (दि. 30 जून) दुपारी 12च्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. परंतू शनिवारपासून शहर भागात पावसाचा जोर पुन्हा वाढला. रविवारी देखील पावसाचा जोर कायम राहिल्याने डोंगर भागातील धबधबे वाहू लागले, त्यामुळे आकाराने लहान असलेले भुशी धरण भरून ओव्हरफ्लो झाले. अवघ्या पाच दिवसात भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. शनिवारी 24 तासात लोणावळा शहर परिसरात 49 मिमी पावसाची नोंद झाली.
मागील वर्षी 30 जूनच्या रात्री भुशी धरण ओव्हरफ्लो झाले होते. आता ऐन रविवारी भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने यापुढे धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आंनद लुटण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी वाढेल. आगामी शनिवारी रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा –
– माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री, फुगडी खेळली, इंद्रायणी स्वच्छतेचे दिले वचन
– वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! शिलाटणे गावाजवळ रात्री भीषण अपघात, सुदैवाने जिवितहानी नाही, परंतु…