मागील काही महिन्यांपासून सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत. परंतू सर्वांसाठीच आता अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. सणासुदीच्या काळात सर्वांसाठी ही गुडन्यूज असणार आहे. लवकरच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या ( LPG GAS ) किमतीत घट होणार आहे. सर्वसामान्यांना लवकरच यातून मोठा दिलासा मिळणार आहे.
मार्च 2022 पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या जेमतेम होत्या. मात्र, रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील युद्धानंतर तेल आणि गॅस वितरित कंपन्यांनी गॅसच्या किमती वाढवल्या. त्यामुळे देशात महागाईचा भडका उडाल्यानंतर आता सरकारने वाढलेल्या गॅसच्या किमतींबाबत विचार करण्यासाठी एक समिती गठित केली आहे.
याद्वारे ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे आदेश पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने जारी केले आहेत. नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट. एस. पारीख ( Kirit Parikh ) यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. ( Government Set Up Kirit Parikh Committee To Moderate LPG Gas Prices )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
आमदार शेळकेंची पवनमावळमधील गणेशमंडळांना भेट; गणरायाच्या आरतीसह ग्रामस्थांशी साधला संवाद
खासदार बारणेंची मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट