व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गहुंजेतील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज श्री हनुमान जन्मोत्सव ; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन

गहुंजेतील हे श्रद्धास्थळ भाविकांमध्ये असलेली आस्था आणि त्यांच्या अनुभवांमुळे अधिकच प्रसिद्ध होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 12, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Hanuman Janmotsav today at famous Hanuman temple in Gahunje Mahaprasad in presence of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील गहुंजे गावातील वामनभाऊ हाउसिंग सोसायटी परिसरात असलेल्या नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात आज, शनिवारी (१२ एप्रिल) हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात व थाटामाटात साजरा होणार आहे. या विशेष प्रसंगी मावळचे आमदार सुनील (अण्णा) शेळके यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या हस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • गहुंजे येथील हे हनुमान मंदिर स्थानिकांसह आसपासच्या गावांमध्ये “नवसाला पावणारा हनुमान” म्हणून विशेष श्रद्धेचे स्थान मिळवून आहे. एका भाविकाने सांगितलेल्या अनुभवानुसार, त्याला काही महत्त्वाच्या कामांमध्ये सतत अडथळे व विलंब होत होते. त्याने या मंदिरात नवस केला आणि अवघ्या एका महिन्यात त्याच्या सर्व अडचणी दूर झाल्या. हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत सुखद व समाधानकारक ठरला. त्यामुळे हे मंदिर भाविकांमध्ये आणखी श्रद्धास्थान बनले आहे.

या मंदिराचे व्यवस्थापन गेली अनेक वर्षे वामनभाऊ हाउसिंग सोसायटीतील कार्यकर्ते – दीपक शहाणे, राजेंद्र खाडे, रामेश्वर बडे, नवनाथ बडे, राजन बडे, लहू खंडारे, बाबासाहेब बडे व त्यांचे सहकारी – अत्यंत नियोजनबद्धपणे करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करताना महाप्रसादाची उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे.

या पावन दिवशी नवस फेडण्यासाठी, दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गहुंजेतील हे श्रद्धास्थळ भाविकांमध्ये असलेली आस्था आणि त्यांच्या अनुभवांमुळे अधिकच प्रसिद्ध होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


Previous Post

25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास जागेवरच फिटमेंट शुल्काशिवाय ‘एचएसआरपी’ बसवून मिळणार

Next Post

वडगावमध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला सुरुवात ; प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या लावणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Potoba-Maharaj-Mandir

वडगावमध्ये ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सवाला सुरुवात ; प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या लावणीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.