पवनानगर परिसरामध्ये भारत देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शासनाने यावर्षी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान स्वातंतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा यावेळी अनेक ठिकाणी विविध उपक्रम यामध्ये हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश, पंचप्रण शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी ध्वजारोहण निमित्त अनेक ठिकाणी प्रभातफेरी, प्रकारच्या स्पर्धा, शालेय साहित्य वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ( Har Ghar Tiranga Meri Mati Mera Desh Panchprana Swear Independence Day celebrated at Pavananagar )
पवना विद्या मंदिर शळेत स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सावा निमित्त शासनाच्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत संपूर्ण पवानानगर येथे रॅली काढुन जनजागृती करण्यात आली होती. पहिल्या (ता.१३ ) दिवसाचे ध्वजारोहणाचा मान पवना शिक्षण संकुलाच्या प्राचार्या श्री.भाऊसाहेब आगळमे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, दुसऱ्या दिवसाचे ध्वजारोहण पवना विद्या मंदिराचे माजी विद्यार्थी व व्यापरी मित्र मंडळाचे उपाध्यक्ष संदीप बुटाला यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी काले गावचे जेष्ठ नागरिक ह.भ.प. ज्ञानोबा महाराज कालेकर, पवना शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर,काले गावच्या पोलिस पाटील सीमाताई यादव, शाळेचे माजी विद्यार्थी सुनील बुटाला, संदिप भुतडा, शक्ती जव्हेरी, जेष्ठ पत्रकार माऊली ठाकर, येळसे गावचे सरपंच व उद्योजक मुकुंद ठाकर, विठ्ठल ठाकर, उद्योजक सचिन साबळे, संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांच्यासह प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
काल ( ता.१५ ) ध्वजाचे पूजन शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर अमृत महोत्सवी ध्वजारोहण काले ग्रामपंचायत सदस्या सौ. योगिता श्रीकांत मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच खंडुजी कालेकर, उपसरपंच अमित कुंभार, ग्रामपंचायत सदस्या छायाताई कालेकर, शालेय समितीचे सदस्य प्रल्हाद कालेकर, नारायण कालेकर, नितीन बुटाला, रामदास मोहोळ, किशोर शिर्के यांच्यासह ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शाळेत हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश, पंचप्रण शपथ व परिसरातील स्वातंत्र्य सैनिक व सैनिक यांचा सत्कार व व्दीप प्रज्वलन करुन देशाच्या संरक्षण करणाऱ्यांना मानवंदना असे विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे सर यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव ढाकणे यांनी केले तर सुत्रसंचलन भारत काळे यांनी केले. ( Har Ghar Tiranga Meri Mati Mera Desh Panchprana Swear Independence Day celebrated at Pavananagar )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील इंदोरी आणि सुदुंबरे येथील 284 आदिवासी ठाकर बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप
– आ-चंद्रसुर्य नांदो…स्वातंत्र्य भारताचे! वडगाव मावळ इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण, ‘या’ कुटुंबाचा केला सन्मान
– नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या! डोळे येण्याच्या आजारापासून बचावासाठी वडगावात तब्बल 3000 आय ड्रॉपचे वाटप