पी.डी.सी.सी. बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
28 एप्रिल रोजी होत असलेल्या पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती, हवेली पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विकास दांगट हे पक्षविरोधी भुमिका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलच्या विरोधात काम करत असल्याने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हाकालपट्टी करत आहे, असे प्रदीप गारटकर यांनी सांगितले. ( PDCC Bank Director Vikas Dangat expelled from NCP for anti party work )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणाले गारटकर?
“पक्षविरोधी कारवायांबद्दल मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने पीडीसीसी बँकचे संचालक माजी नगरसेवक विकास दांगट यांची पक्षातून हाकालपट्टी करीत आहे. तसेच हवेली तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील जे पक्षविरोधी भूमिका घेऊन काम करतात, त्यांना आवाहन करतो आपण कृपया पक्षविरोधी कारवाया थांबवाव्यात, आपणांवर देखील कारवाई करावी लागेल, असा गर्भित इशारा पक्षविरोधी काम करणा-यांना देण्यात येत आहे.”
“एक वर्षापुर्वी झालेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत प्रकाश म्हस्के आणि दांगट यांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. दोघे राष्ट्रवादीचे परंतु त्यांच्यात एकमत होत नसल्याच्या कारणावरुन शेवटच्या क्षणी नाईलाजास्तव हा निर्णय पक्षाला घ्यावा लागला होता. त्या निवडणुकीत पक्षाच्या अनेक मान्यवरांनी दांगट यांचे उघडपणे काम केले होते. त्यामुळेच ते विजयी झाले होते, याची जाणीव दांगट यांनी ठेवलेली दिसत नाही.” असेही गारटकर म्हणाले. ( Haveli Pune Agricultural Produce Market Committee Election )
अधिक वाचा –
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : “राजकीय पक्षाचा प्रचार करणाऱ्या सचिवावर त्वरित कारवाई करा”, भेगडेंच्या पत्राने खळबळ
– आधार संबंधित विविध समस्यांबाबत तळेगाव भाजपाचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन