आज कालच्या धकाधकीच्या आयष्यात अनियोजित जीवनशैली आणि आहार यामुळे लोकांना असे काही जडतात की हे आजार कुणाला लवकर सांगताही येत नाहीत आणि लपवता ही येत नाहीत. बुधवार (दिनांक 13 सप्टेंबर 2023) रोजी हीलींग हँड्स फाउंडेशन आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्र दारुंब्रे, मॉन्डेलिझ इंडिया फुड्स प्रा. लि., बाल रक्षा भारत (सेव द चिल्ड्रन ) यांच्या संयुक्त विद्यमाने मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स आणि इतर पोटाचे विकारावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
हिलींग हँडस फाउंडेशन डॉ अश्विनी परगेवार यांनी पेशंट तपासणी केली. आहार कसा असावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले आणि औषध वाटप केले. यावेळी आनंद मिसाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबीर सकाळी 11 ते 2 या दरम्यान घेण्यात आले. सदर शिबिरात 69 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. औषधे वाटप करण्यात आली.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र दारुंब्रेकडून डॉ प्रिन्सि डेव्हिड (मेडिकल ऑफिसर) केतन जाधव (Mpw) मोंडेलिझ इंडिया प्रा. लि., सेव्ह द चिल्डन (बाल रक्षा भारत) कडून पूनम गायकवाड (समुपदेशक) रवींद्र ठाकरे (समुपदेशक) आशा वर्कर वैशाली बळवंत वाल्हेकर, गायत्री संतोष जाधव (आशा वर्कर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच उमेश आगळे यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.
अनिता सैद (शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक) यांनी शिबिराचे पूर्ण नियोजन केले होते. आजारांविषयी योग्य माहिती आणि मार्गदर्शन गावोगावी पोहोचवण्याचा मधुरा भाटे (संस्था समनव्यक) डॉ अश्विन पोरवाल (अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन) डॉ स्नेहल पोरवाल (सेक्रेटरी हींलिंग हॅन्डस फाउंडेशन) यांचा प्रयत्न आहे. ( health camp at darumbre village free examination of 69 patients )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आरपीआय वाहतूक आघाडी मैदानात
– मावळच्या आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सोमाटणेतील ‘त्या’ 3 मराठा युवकांचे थेट मुख्यमंत्र्यांना निवदेन
– मोठी बातमी! धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम शाळांमध्ये असलेली प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय