वडगाव मावळ इथे रविवारी (12 फेब्रुवारी) भारतीय जनता पार्टी वडगाव शहर आणि युवक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू नागरिकांना 500 रुपये इतक्या माफक आणि सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मुलुंड भाजपा नगरसेवक नील सोमय्या उपस्थितीत होते. ( Hearing Aid Distribution Program At discounted Price In Vadgaon Maval By BJP In Presence Of Neil Somaiya )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहर भाजप सातत्याने वेगवेगळे सामजिक उपक्रम राबवून शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांची सेवा करण्याचे कार्य करत आहेत. याच कार्याच्या माध्यमातून कमी ऐकू येणाऱ्या नागरिकांसाठी सवलतीच्या दरात श्रवणयंत्र वाटप कार्यक्रम पार पडत असल्याचा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी यावेळी बोलताना दिली.
कार्यक्रमाला नील सोमय्या, रविंद्र भेगडे यांच्यासह पोटोबा महाराज मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, प्रभारी भास्कर म्हाळसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, पवना कृषकचे चेअरमन विठ्ठल घारे, वडगाव शहरचे अध्यक्ष अनंता कुडे, युवा अध्यक्ष विनायक भेगडे यांच्यासह वडगाव शहरातील सर्व नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतमार्फत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी आणि डिजिटल कार्ड वाटप शिबीर
– सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेचे स्नेह संमेलन उत्साहात; आमदार शेळकेंच्या हस्ते मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन