Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या धो-धो पावसाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव मावळ शहराला मोठा फटका बसला आहे. गेल्या 24 तासापासून शहरात मुसळधार पाऊस पडत असून सोसाट्याच्या वाऱ्याने शहराला झोडपले आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्याचे वृत्त असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कोर्ट परिसरात भिंत पडल्याची घटना घडली असून शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर एक दोन जागी वृक्ष पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसेच सततच्या पावसामुळे आणि वादळीवाऱ्यामुळे पहाटेपासूनच शहरातील अनेक भागातील विज गायब आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणीसाठल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल होत आहेत. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Heavy rain in Vadgaon Maval City power supply interrupted )
अधिक वाचा –
– पवनमावळ भागातील 186 विद्यार्थ्यांना मिळाला डिजिटल गुरु, रोटरी क्लब मावळकडून स्टडी ॲपचे मोफत वाटप । Maval News
– हुल्लडबाजी करणे, बंदी असलेल्या ठिकाणी जाणे भोवले ; लोणावळ्यात 48 पर्यटकांवर कारवाई । Lonavala News
– आरोपींना फाशी द्या, पीडित कुटुंबाला न्याय द्या ! मावळातील तिहेरी हत्याकांडाचा मुस्लीम समाजाकडून निषेध, प्रशासनाला निवेदन