पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड या विद्यालयामध्ये नुकताच वह्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवयुग सोशल फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात मिळाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अर्थ उन्नती अर्बन नि. लि .बँकेचे संचालक व नवयुग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ह. भ.प अक्षय महाराज येवले हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी युवा कीर्तनकार झी टॉकीज फेम ह. भ. प सौ.जयश्री ताई येवले यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी संत, महात्मे व इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील आदर्शांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनात करून स्वतःचा उत्कर्ष करावा. असे केले तर जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन केले. ( Help from Navayug Social Foundation to students of New English School Chandkhed )
या प्रसंगी जय कोचिंग क्लासेसचे संचालक संजीव भालेराव हे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक अजिनाथ ओगले यांनी विद्यार्थ्यांना, “अभ्यास करून स्वतःमधील क्षमता विकसित करून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवावा,” असे आवाहन केले. विद्यालयातील जेष्ठ अध्यापक सत्यवान पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शुभांगी पवार यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे लवकर वाटप व्हावे – सकल मराठा समाज
– …तर अशा संबंधितांवर कठोर कारवाई करा – आमदार सुनिल शेळके यांची मागणी – पाहा व्हिडिओ । MLA Sunil Shelke
– भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, पीडितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर ! अजित पवार यांची विधानसभेत घोषणा