Dainik Maval News : बांगलादेश येथे हिंदूंवर झालेल्या आणि होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुरूवारी (दि. 29) सकल हिंदू समाज मावळ यांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक मान्यवर आणि सामान्य नागरिक सामील झाले होते. श्री पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय मावळ असा पायी मोर्चा यावेळी काढण्यात आला. आंदोलकांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बांगलादेश येथे असंख्य हिंदूंवर अत्याचार होत आहेत. तिथे मंदिरे, हिंदूंची घरे जाळली जात आहेत. हिंदूंना टार्गेट केले जात आहे. अशा मनोवृत्तीचा सरकारने निषेध करून तेथील हिंदूंना संरक्षण देण्यात यावे. मावळ विभागात तळेगाव, लोणावळा, वडगाव, देहूरोड, कामशेत व इतर भागात रोहिंगे बांगलादेशी येण्याचे प्रकार घडत आहेत. त्यासंदर्भात चौकशी व्हावी, अशी विनंती सकल हिंदू समाज मावळ तालुका यांच्याकडून निवेदनातून करण्यात आली आहे. ( Hindu Jan Aakrosh Morcha of Sakal Hindu Samaj Maval at Vadgaon )
अधिक वाचा –
– ‘त्याच ठिकाणी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार
– कान्हे शाळेत बाल गोविंदांनी फोडली दहीहंडी, राधा – कृष्ण यांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
– पंचायत समिती मावळच्या शिक्षण विभागामार्फत तळेगावात तालुकास्तरीय प्रज्ञाशोध कार्यशाळा संपन्न । Maval News