व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अनधिकृत होर्डिंगकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – खासदार श्रीरंग बारणे

ज्या होर्डिंगला परवानगी आहे त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 18, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
mp-shrirang-barne

Photo Courtesy : PR / Mp Shrirang Barne


पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत होर्डिंग आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली. पण, न्यायालयाचे कारण पुढे करून महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. शहरातील सगळे अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे. ज्या होर्डिंगला परवानगी आहे त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे, अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका आयुक्तांना केली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, वादळी वा-यासह होणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी आडोशाला थाबलेल्या व्यक्तीच्या अंगावर किवळे येथे होर्डिंग पडल्याने पात जणांचा मृत्यू झाला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यात मृत व जखमी झालेले व्यक्ती हे सर्वसाधारण कुटुंबातील आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्यशासनाने मदत केली आहे. पण, महापालिकेने ही काही मदत करावी. ( Hoarding Accident Case deliberate neglect of municipal administration towards unauthorized hoardings in city said mp shrirang barane )

“शहरात अनाधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. शहराच्या सर्व भागात होर्डिंग दिसतात. त्यातील जवळपास 2200 होर्डिंग हे अनाधिकृत आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता शहरात असे होर्डिंग उभारले जात आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. यामध्ये प्रशासन व अनाधिकृत होर्डिंग मालक याचे आर्थिक देणेघेणे असल्याचे दिसून येते, यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी निविदा काढण्यात आली होते. केवळ न्यायालयाचे कारण पुढे करून महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे.”

हेही वाचा – दुर्दैवी! जिथे आडोसा घेतला तिथेच काळाने घाला घातला, किवळे इथे होर्डिंग्ज कोसळून 5 जण ठार

शहरातील सगळे अनधिकृत होर्डिंग काढण्यात यावे. ज्या होर्डिंगला परवानगी आहे त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. किवळे येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. जखमींचा पूर्ण खर्च महापालिकेने करावा. यापुढे महापालिकेने मुख्य चौकांमध्ये अपघात होईल अथवा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी होर्डिंगला परवानगी देऊ नये, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. ( Hoarding Accident Case deliberate neglect of municipal administration towards unauthorized hoardings in city said mp shrirang barane )

अधिक वाचा –
– ‘अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्यांवर आणि त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी’ – आमदार सुनिल शेळके
– ‘जीवात जीव तोवर राष्ट्रवादीतच…कुणाच्याही सह्या घेतलेल्या नाहीत…माझ्याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही’ – अजित पवार


Previous Post

मावळ तालुक्यातील ओझर्डे, कांब्रे आणि साते गावातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मदत

Next Post

जवणच्या घाटात ब्रेक फेल लालपरीचा थरार! बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
st-bus-break-fail

जवणच्या घाटात ब्रेक फेल लालपरीचा थरार! बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.