शनिवार, दिनांक 15 एप्रिल रोजी खंडाळा बोरघाटात झालेला बस अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 28 लोकांचे जीव वाचवण्यात यश आले होते. पहाटे चारच्या सुमारास अपघात झाल्यानंतर पुढे तब्बल 13 तास बचावकार्य सुरु होते. या बचावकार्यात सक्रीय सहभाग घेऊन अनेकांचे जीव वाचवणारे विविध रेस्क्यू टीमचे सदस्या यांच्यासोबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्नेहभजनाचे आयोजन करण्यात आले होते. फक्त माणुसकी हाच एक धर्म हा संदेश या कृतीतून दिसून आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली, यशवंती हायकर्स खोपोली, सजग सामाजिक संस्था खोपोली, देवदूत टीम, पोलिस, वाहतूक शाखा, शिवदूर्ग मित्र लोणावळा, वन्यजीव रक्षक मावळ या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ( Honoring and lunching of rescue teams who helped in Borghat bus accident khopoli raigad )
खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयूब तांबोळी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार, सहायक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. ॲम्बुलन्स ऑपरेटर, खाजगी आणि सरकारी डॉक्टर, मदतीसाठी आलेल्या सर्व नागरिक यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली गेली.
“मी महाराष्ट्रातला वेगवेगळ्या ठिकाणी गेली बावीस वर्षे नोकरी करत असताना एवढा मोठा एवढा भीषण अपघात मी कधी पाहिले नव्हता. या तीव्र अपघाताचे गांभीर्य ओळखून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, यशवंती हायकर्स खोपोली, देवदूत यंत्रणा आणि इतर सामाजिक संस्थांनी ज्या कौशल्यपूर्ण रीतीने हा सर्व घटनाक्रम हाताळला तो पाहता यांना एनडीआरएफ म्हणावे की काय असे वाटते त्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की हे एनडीआरएफ पेक्षा सरस आहेत. मी रायगडचा पोलीस अधीक्षक म्हणून तुम्ही केलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त करतो.” – सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक रायगड)
मावळ तालुक्यातील शिवदुर्ग मित्र लोणावळा व वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी मदतकार्य केले त्या स्वयंसेवकांची नावे खालीलप्रमाणे;
1)राजेंद्र कडू 2)महेश मसने 3)सचिन गायकवाड 4)योगेश उंबरे 5)सनी कडू 6)सुरज वरे 7)योगेश दळवी 8)हर्षल चौधरी 9)आदित्य पिलाने 10)अजय शेलार11)प्रवीण देशमुख 12)रिकी मते 13)प्रणय अंबुरे 14)ओंकार पडवळ 15)समीर जोशी 16)शैलश भोसले 17)संतोष खोसे 18)रमेश मते 19)संदीप गायकवाड 20)कपिल दळवी 21)दत्ता निपाने 22)जगन्नाथ गरवड 23)हरिश्चंद्र गुंड 24)सागर पाठक 25)दिनेश पवार 26)मधुर मुंगसे 27)अशोक उंबरे 28)गणेश रौंदळ 29)अमित बलकवडे 30)सदाशिव सोनार 31)चंद्रकांत गाडे 32)हनुमंत भोसले 33)केतन खांडेभरड 34)अमोल सुतार 35)कौशल दुर्गे 36)कमल परदेशी 37)निलेश गराडे 38)अनिल आंद्रे 39)सचिन वाडेकर 40)सत्यम सावंत 41)दक्ष काटकर 42)कुणाल कडु 43)के एस पिल्ले 44)सागर कुंभार 45)गणेश गिद 46)रितेश कुडतरकर 47)महादेव भंवर 48)सुनील गायकवाड, 49)अमित गुरव, 50)संजय पिंगळे, 51)वैभव मुंगसे 52) विशाल पाडाळे 53) साहील ढमाले
अधिक वाचा –
– आंदर मावळ आणि नाणे मावळला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सात कोटींचा निधी – आमदार सुनिल शेळके
– देशपातळीवरील ‘उत्कृष्ट पर्यटन खेडे’ स्पर्धेत सहभाग घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन