व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप, वडगाव मावळ कोर्टाचा निकाल ; पीडित पत्नीने मृत्यूपूर्व दिलेला जबाब ठरला निर्णायक

छळाची परिसीमा ओलांडत आरोपीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 29, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Jail-And-Court

File Image


Dainik Maval News : हुंड्यासाठी सतत छळ करत अखेर पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी पतीला वडगाव मावळ जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निर्णय देताना आरोपी सियाराम पंचम विश्वकर्मा याला १८ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या खटल्यात पीडित आरती विश्वकर्मा हिने मृत्यूशय्येवर दिलेला जबाब अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरला. तसेच, पुरेशा पुराव्याअभावी सहा जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

Novel NIBR Ads

आरती आणि सियाराम यांचा विवाह २ मे २००८ रोजी झाला होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आरतीच्या भावाने विवाहाच्या वेळी हुंड्यापोटी ठरलेल्या पाच लाख रुपयांपैकी सुरुवातीला केवळ एक लाख रुपये दिले होते. त्यानंतर उर्वरित रक्कम देणे शक्य नसल्याने सासरी तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. शिवीगाळ, मारहाण असे प्रकार वारंवार होऊ लागले. त्रास असह्य झाल्याने आरती काही काळ माहेरी राहिली. मध्यस्थीनंतर ती पुन्हा सासरी गेली; मात्र अत्याचार सुरूच राहिले.

छळाची परिसीमा ओलांडत आरोपीने आरतीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात स्पष्ट झाले. लाथाबुक्क्यांनी झालेल्या बेदम मारहाणीमुळे ती गंभीर जखमी झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच तिने पोलिसांसमोर दिलेला जबाब तिच्या मृत्यूनंतर या खटल्यातील मुख्य पुरावा ठरला.

आरतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, देहूरोड पोलीस ठाण्यात पती आणि कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान सादर केलेल्या साक्षी आणि पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने पती सियाराम विश्वकर्मा याला दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती

Next Post

मावळात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघात ; देहूरोड आणि कामशेत येथील अपघातांमध्ये कार पलटी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Two accidents on old Pune-Mumbai highway in Maval Car overturns at Dehu Road and Kamshet

मावळात जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन अपघात ; देहूरोड आणि कामशेत येथील अपघातांमध्ये कार पलटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.