Dainik Maval News : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटना, सोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांनी निवासस्थानी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा निवासी कल्याण संघटना, सोसायटीमध्ये वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची एकत्रित बुकिंग केल्यास कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येणार आहे.
राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वीची नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येत आहे. अशा जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता तीन उत्पादकांची परिवहन विभाग मार्फत निवड केली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर ही पाटी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा. ही पाटी बसविण्याकरता वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी संचासह बसविण्याचे जीएसटी वगळून शुल्क
दुचाकी वाहने व ट्रॅक्टर 450 रुपये, तीन चाकी वाहने 500 रुपये, हलकी वाहने, प्रवासी कार, मध्यम व जड वाहने 745 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे. या शुल्काशिवाय इतर कुठलेही शुल्क अनुज्ञेय नाही. काही फिटमेंट केंद्रामध्ये जुन्या वाहन नोंदणीच्या पाटी काढायचे शुल्क घेतले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तरी नागरिकांच्या याविषयी काही तक्रारी असल्यास त्यांनी 022- 20826498 या क्रमांकावर आणि hsrpcomplaint.tco@gmail.com या ईमेलवर कराव्यात असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates