Dainik Maval News : कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटच्या ( Kanhe Sub District Hospital ) नवीन इमारतीच्या कामाची पाहणी आमदार सुनिल शेळके यांनी नुकतीच केली. यावेळी, रुग्णालयातील कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच केले जाणार असल्याची माहिती देखील आमदार सुनील शेळके यांनी यावेळी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक एम पल्ली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, वैद्यकीय अधीक्षक वर्षा पाटील, शाखा अभियंता नंदकुमार खोत व इतर अधिकारी उपस्थित होते.
कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे काम बर्यापैकी पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. रुग्णालयातील सोयी सुविधा, विविध विभागातील वैद्यकीय सामग्री ही कामे त्वरित पूर्ण करावीत. ट्रॉमा केअर सेंटरमध्येही आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा कराव्यात, तसेच अधिक निधीची आवश्यकता भासल्यास तांत्रिक कार्यवाही पूर्ण करुन उर्वरित कामांना गती देण्याबाबतच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कान्हे येथील ग्रामीण रुग्णालय अद्ययावत व्हावे ही मावळकरांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. कान्हे ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होऊन उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर अशी भव्य इमारत उभी राहिली आहे. नवीन आराखड्याप्रमाणे सुसज्ज असे रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. यामुळे तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवेला बळकटी मिळणार आहे.
अधिक वाचा –
– ‘सरनाईक इज बॅक’ , तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक । Talegaon Dabhade
–अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार
– नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप । Maval News