वडगाव येथे एका कंपनीत उंदीर पडकण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीत नाग अडकल्याची घटना घडलीये. एक भला मोठा नाग उंदीर पकडायचा पिंजऱ्यात अडकला होता. याबात कंपनीच्या काही लोकांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद यश बच्चे यांना माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र यश बच्चे, जिगर सोलंकी, रोहित पवार हे तिथे पोहचले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्यांनी पाहिले की, एक मोठा नाग पिंजऱ्यात अडकला होता. तिथे एक उंदीर पण अडकला होता. कदाचित त्या उंदराला खाण्यासाठीच नाग तिथे आला असावा. सर्पमित्रांनी लगेचच त्या नागाची सुटका केली आणि काही जखम नसल्याने त्याला सुखरूप निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.
उंदीर पकडण्यासाठी काही कंपनीत पिंजरे लावले जातात किंवा ग्लू ट्रॅप लावतात. त्यात उंदीर अडकले की त्याच्या वासावर साप येतो आणि कधी कधी त्यात अडकू पण शकतो. तरी शक्यतो असे पिंजरे सारखे चेक केले पाहिजेत, जेणेकरून साप अडकल्यास त्याचा मृत्यू होणार नाही. – जिगर सोलंकी (प्राणी अभ्यासक, वन्यजीव रक्षक मावळ संस्था)
कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळ पास च्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागला संपर्क (१९२६) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थे चे संस्थापक निलेश गराडे ९८२२५५५००४ आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे. ( Indian cobra snake caught in rat trap )
अधिक वाचा –
– अभंग प्रतिष्ठान आणि विश्व अग्निहोत्र परिवार यांच्या वतीने 100 गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि वह्यांचे वाटप । Dehu News
– निगडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान ठाकर बिनविरोध । Gram Panchayat Election
– लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे अवैधरित्या हुक्का विकणाऱ्या दोघांवर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, मुद्देमाल जप्त । Lonavala Gramin Police