मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे आदिवासी महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. फ्रेनी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की व्यसनांचे शरीरावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांची जाणीव त्यांनी महिलांना करून दिली. त्यापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवावे असे सांगितले. शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ कसे ठेवावे याबद्दल डाँ.फ्रेनी यांनी मार्गदर्शन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तर यावेळी बोलताना संध्या थोरात यांनी सांगितले की, मावळ तालुका हा ग्रामीण भाग असुन यामध्ये अनेक आदिवासी कुंटब आहे. आमच्या कल्बच्या सदस्या आराध्या गांधी यांचा आज वाढदिवस असल्याने आम्ही अनाठायी खर्च टाळून आदिवासी पाड्यावर मार्गदर्शन व जिवनावश्यक वस्तू भेट देऊन वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल त्यांनी गांधी यांचे आभार मानले. तर यावेळी थोरात यांनी आव्हान केले कr, आपल्या घरातील सदस्य यांचे वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरे न करता आदिवासी पाड्यावर जाऊन त्याठिकाणी मार्गदर्शन व विविध समाज उपयोगी ठरेल असे अनेक उपक्रम राबविण्यात यावे असे, त्यांनी सांगितले आहे. (Inner Wheel Club of Talegaon Dabhade giving guidance to tribal women on de-addiction)
यावेळी आदिवासी महिलांना व लहानग्या जिवनावश्यक वस्तू चे वाटप केले आहे. यावेळी उपस्थितीत कल्बच्या सदस्या संध्या थोरात, चांदणी गांधी,आराध्या गांधी,आंबेगाव माजी सरपंच भिकाबाई वाघमारे उपस्थितीत होत्या.
अधिक वाचा –
– भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024
– कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke
– वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval