मावळ तालुक्यातील बऊर येथे शनिवार (12 नोव्हेंबर) रोजी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी मिरवणूक, हरिपाठ, कीर्तन, महाप्रसाद, हरिजागर अशा अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले होते. दिनांक 11 नोव्हेंबर ते दिनांक 12 नोव्हेंबर असा एकूण दोन दिवस हा सोहळा सुरु होता. यावेळी ह. भ. प. सचिन महाराज जाधव यांची कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली होती. ( Installation of Ganesha Idol In Baur Village Of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कीर्तनाला पंचक्रोशीतील हजारो वारकरी, भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, नितीन मुऱ्हे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, थेट जनतेतून होणार सरपंचाची निवड
– महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून साडेपाच लाख उकळले, तळेगाव दाभाडेतील तरूणाची पोलिसांत धाव