मावळ तालुक्यातील बेबडओहोळ येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दिनांक 31 मार्च) रोजी संपन्न झाला. ( Jal Jeevan Mission Bhumipoojan Ceremony Of Tap Water Supply Scheme At Bebadohal Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 4 कोटी 91 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून सुमारे 3 लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी, जल शुद्धीकरण प्लांट उभारण्यात येणार असून गावात अंतर्गत 18 किलोमीटर पाईपलाईन टाकून त्याद्वारे प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचवण्यात येणार आहे. या भूमिपूजन समारंभाला जेष्ठ मान्यवर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – जल जीवन मिशन : काले कॉलनी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन संपन्न
मावळ तालुक्यातील #बेबडओहोळ येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.३१ रोजी संपन्न झाला.'जल जीवन मिशन' अंतर्गत या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी ४ कोटी ९१ लक्ष रु.निधी उपलब्ध झाला आहे.#hargharjal @jaljeevan_ #maval pic.twitter.com/dgoyGPp0tb
— Sunil Shelke (@shelkesunilanna) April 1, 2023
जल जीवन मिशन अंतर्गत मावळ तालुक्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तसेच आताही अनेक गावांत या योजनांचे काम सुरु असून अनेक गावांत भूमीपूजन होऊन पाणीपुरवठा योजनांचे काम मार्गी लागत आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार सुनिल शेळके यांनी वडगाव येथे तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी प्रस्तावित आणि प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सुचना केल्या होत्या. ( Jal Jeevan Mission Bhumipoojan Ceremony Of Tap Water Supply Scheme At Bebadohal Village Maval Taluka )
अधिक वाचा –
– पवनमावळातील फुल उत्पादक शेतकऱ्याला जिल्हा परिषदेचा ‘आदर्श कृषीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार, कौतुकाचा होतोय वर्षाव
– डोणे गावात स्त्री सबलीकरणाचे पहिले पाऊल, महिला ग्रुपकडून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या पहिल्या युनिटचे उद्धाटन